Solar esakal
नाशिक

Sahyadri Farms Project: जिल्ह्यात 20 सोलर टनेल अन 90 सोलर पंप कार्यान्वित! सह्याद्री फार्म्सचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

Sahyadri Farms Project : फळे आणि भाजीपाला काढणी पश्‍च्यात व्यवस्थापन व मूल्यवर्धनसाठी सोलर ड्रायरसारखा पर्याय उपयुक्त ठरतो. सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्यातर्फे सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प गेल्यावर्षी राबवण्यात आला.

त्यामध्ये ५०० किलो क्षमतेचे २० सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. त्यासाठी सस्टेन प्लसने प्रत्येक ड्रायरला ६५ टक्के अर्थसहाय्य केले.

उर्वरित ३५ टक्के आर्थिक भार शेतकऱ्यांनी उचलला. शेतकऱ्यांना २० लाखांचे अर्थक साह्य मिळाले. (20 solar tunnels and 90 solar pumps in district Project of Sahyadri Farms nashik)

ड्रायरची उभारणी इंदूरच्या रहेजा सोलार संस्थेने केली. सोलर ड्रायर उभारणीनंतर शेतकऱ्यांना सह्याद्री फार्म्स व रहेजा सोलरतर्फे उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांनी बेदाणा, टोमॅटोचे सुकवलेले काप, तर गेल्या मार्चपासून सुकवलेल्या कांद्याचे उत्पादन घेतले.

टोमॅटो आणि कांद्याच्या घसरलेल्या भावाच्या स्थितीत सोलर ड्रायर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मार्ग होऊ शकला. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५ टन बेदाणा, २ टन टोमॅटो व १० टन कांद्याची प्रक्रिया केली.

प्रक्रिया केलेल्या मालाची खरेदी रहेजा सोलार्सतर्फे केली जात आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अन्न -प्रक्रियेंतर्गंत आणि सस्टेन प्लसतर्फे शेतकऱ्यांना सोलर ड्रायर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खंडित वीजपुरवठ्यावर पर्याय

सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांच्या शेतात सस्टेन प्लसच्या माध्यमातून ९० सोलर पंप बसवण्यात आले. त्यामध्ये सस्टेन प्लसकडून ६० टक्के आर्थिक साह्य प्राप्त झाले.

शेतकऱ्यांना विस्कळित वीजपुरवठ्याच्या प्रश्‍नावर मात करता आली. तसेच पिकांवर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले.

"‘द्राक्ष काढणीनंतर उरलेल्या मण्यांना प्रक्रिया केल्याने अधिकचा भाव मिळाला. पूर्वी आम्ही मणी व्यापाऱ्यांना विकायचो. परंतु आता सोलार ड्रायरमुळे चांगल्या दर्जाची बेदाणा निर्मिती करून त्यातून मूल्यवर्धन झाले. त्यामुळे उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग तयार झाला."

- महेंद्र सुरवाडे, खतवड (ता. दिंडोरी)

"सस्टेन प्लसच्या सहकार्याने आम्ही सोलर ड्रायर व सोलर पंपाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबवला. यातून अपारंपरिक ऊर्जेचा वापर शेतीसाठी करताना सोलर पंप व सोलर ड्रायर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यामध्ये मूल्यवर्धन करून काढणी पश्‍चात होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण आणता आले. यातून शेतमालाचे दर पडण्याच्या काळात पर्यायी व्यवस्था नक्कीच उभी राहू शकेल."- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स, मोहाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT