cctv
cctv esakal
नाशिक

सिंहस्थात 200 CCTV कॅमेरे; साधुग्राम Drone Cameraच्या निगराणीत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने साधुग्राममध्ये स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस व स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयातील कमांड कंट्रोल सेंटरमधून होणार आहे. (200 CCTV cameras in Simhastha Sadhugram under drone camera surveillance by smart city Nashik Latest Marathi News)

२०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याची तयारी तीन-चार वर्षांपासूनच करावी लागते. सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महापालिकेकडे असते. पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून होत असते. आगामी सिंहस्थात माहिती व तंत्रज्ञानाला महत्त्व राहणार आहे.

त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. २०२३ मध्ये स्मार्टसिटी कंपनीची मुदत पूर्ण होत आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा मुदत संपण्यापूर्वीच पूर्ण करून घेतल्या जाणार आहेत. स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांची बैठक गेल्या आठवड्यात झाली. तीत सिंहस्थासाठी नियोजन करण्याचा निर्णय झाला.

सिंहस्थ कुंभमेळ्यात जगभरातून साधू-महंत दाखल होतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था महापालिकेतर्फे केली जाते. महापालिकेला शासनाकडून अनुदान प्राप्त होते. निवासासाठी महापालिकेतर्फे तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाते. साधुग्राममध्ये सुरक्षा पुरविण्याचे काम पोलिस करतात. साधुग्राममधील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका व पोलिस प्रशासनाने स्थानिक पातळीवर घेतला होता.

त्यासाठी स्मार्टसिटी कंपनीसमोर प्रस्ताव सादर केला होता. दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेरे महापालिकेच्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरशी संलग्न केले जाणार आहेत. मंजुरीनंतर वर्षभरात प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी ७० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर वॉटर मीटर

सिंहस्थापूर्वी भूमिगत जलवाहिनी, वीजवाहिनींचे जीआयएस मॅपिंग, जलशुद्धीकरण केंद्र, स्काडा वॉटर मीटर ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. वाणिज्यिक वापर होत असलेल्या जवळपास साडेसात हजार ठिकाणी स्काडा वॉटर मीटर बसविले जाणार आहे. त्यातील एक हजार जागा निश्‍चित केल्या आहेत. नऊ जलशुद्धीकरण केंद्रे व ११० जलकुंभांवर स्काडा मीटर बसविले जाणार आहे.

"सिंहस्थाच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांसाठी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे." - सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सटी कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT