download.jpg 
नाशिक

२०२० ठरले आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष; हवामान बदलाच्या ई-अहवालातून स्पष्ट

सकाळवृत्तसेवा

नाशिक : देशभरातील हवामानाच्या नोंदी १९०१ पासून केल्या जातात. त्या नोंदींनुसार २०२० हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने २०२० मधील हवामान बदलाचा ई-अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे. 

ही दशके सर्वाधिक उष्ण दशकांपैकी...

पृष्ठभाग, तसेच हवेचे वार्षिक तापमान वर्ष २०२० मध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक होते. गेल्या वर्षी देशात जमीन आणि हवेचे तापमान सरासरी ०.२९० सेल्सिअस इतके अधिक राहिले. जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातील फरक २०२० मधील जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत अधिक १.२० सेल्सिअस इतके होते. सर्वांत उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदविल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षांतील म्हणजे २००६ ते २०२० मधील आहेत. २००१ ते २०१० आणि २०११ ते २०२० ही दशके सर्वाधिक उष्ण दशकांपैकी आहेत. 

जून ते सप्टेंबरमधील पाऊस सरासरीपेक्षा अधिक

देशातील नैर्ऋत्य मोसमी हंगामातील म्हणजेच जून ते सप्टेंबरमधील पाऊस सरासरीपेक्षा अधिक होता. तो १०९ टक्के इतका राहिला. देशात गेल्या वर्षी ईशान्य मोसमी हंगामातील पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहिले. २०२० मध्ये उत्तर हिंदी महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळा म्हणजे शक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’, तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’ हे होय. हवामानासंबंधित प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर आदींचा त्यात समावेश होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT