corona-virus-25199.jpg 
नाशिक

Corona Update : नाशिकमध्ये एकाच दिवसात 21 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णसंख्या थेट 91 वर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : सावध उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणी करूनही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (ता. 18) दिवसभरात तब्बल 21 कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या थेट 91 वर पोचली आहे. दरम्यान, गोविंदनगरच्या मनोहरनगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा 15 व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 21 रुग्णांची भर पडली आहे. यात नाशिक शहरातील सहा, तर मालेगावातील 15 रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व बाधित रुग्ण आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील, नातलग वा संपर्कातील आहेत. 

रुग्णांपैकी चौघे संजीवनगर वसाहतीतील वृद्ध महिलेचे निकटवर्तीय, नातलग

शनिवारी दुपारी नाशिक शहरातील चौघे, तर सायंकाळी मालेगावातील पाच रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात मालेगावचे दहा आणि नाशिकमधील दोन रुग्णांची भर पडली. शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी चौघे संजीवनगर वसाहतीतील वृद्ध महिलेचे निकटवर्तीय, नातलग आहेत. तर रात्री उशिरा आलेल्या अहवालातील नाशिकमधील रुग्ण हे यापूर्वीच्या नाशिक रोड व सिन्नरमधील रुग्णांच्या संपर्कातील आहेत. गेल्या 4 एप्रिलला मनोहरनगरमध्ये शहरातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. जिल्हा रुग्णालयात 14 दिवसांच्या उपचारानंतर 15 व्या दिवसाच्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तर 16 व्या दिवसाचा तिसरा रिपोर्ट प्रलंबित आहे. या रिपोर्टची आरोग्य विभागाला प्रतीक्षा असून, हाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन 14 दिवस होम क्वारंटाइन केले जाईल. 

मालेगावमध्ये दोघांचा मृत्यू 

शहरातील जीवन हॉस्पिटल व सामान्य रुग्णालयात शनिवारी दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी प्राप्त अहवालात प्रथमच पश्‍चिम भागातील संगमेश्‍वरातील एक रुग्ण असल्याने कोरोनाचा कहर वाढून सर्वदूर फैलाव होण्याच्या भीतीने शहरवासीय हादरले आहेत. जीवन हॉस्पिटलमध्ये शनिवारी 33 वर्षीय तरुणाचा, तर सामान्य रुग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हे दोघेही कोरोना संशयित रुग्ण असून, त्यांचा अहवाल मात्र प्रलंबित आहे. मृत्यू झालेला तरुण हा सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या कमालपुरा भागातील, तर वृद्ध रुग्ण नयापुरा भागातील आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनंतर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 वर गेली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. नवनवीन भागातील रुग्ण आढळून येत असल्याने कंटेन्मेंट क्षेत्र वाढणार आहे. यापूर्वी फक्त सात कंटेन्मेंट क्षेत्र होते. त्यात दुप्पट वाढ होणार आहे. एकूण 16 ते 18 कंटन्मेंट क्षेत्र असतील. त्याचा आराखडा व नकाशा महापालिकेच्या नगररचना विभागाकडून तयार करण्यात येत असल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. 

कोरोनाबाधितांची सद्यःस्थिती 

* जिल्हा रुग्णालय ----- सात 
* नाशिक महापालिका रुग्णालय ----- सहा 
* मालेगाव ----- 77 
* एकूण ----- 91 
* उपचार सुरू ----- 74 
* मृत ----- चार (एक धुळ्यातील मृत युवतीसह) 
* कोरोनामुक्त ----- एक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT