Corona update News  esakal
नाशिक

Corona Update : जिल्ह्यात 21 पॉझिटिव्‍ह; 99 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने अनेक दिवसांनंतर सोमवारी (ता. २५) दिलासादायक स्‍थिती राहिली. दिवसभरात अवघे २१ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ९९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली.

यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत तब्‍बल ७८ ने घट झाली आहे. सातशे पार गेलेली सक्रिय रुग्‍णसंख्या सध्या ६३४ झाली आहे. (21 positive in district 99 patients corona free Nashik Corona Update Latest Marathi news)

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात १६, नाशिक ग्रामीणमध्ये चार, तर जिल्‍हाबाहेरील एका रुग्‍णाला कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळला नाही.

दुसरीकडे तब्‍बल ९९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. सोमवारी पॉझिटिव्‍हीटी दरातही घट राहिली. जिल्‍ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.४९ टक्‍के राहीला, तर नाशिक महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्‍हीटी दर ४.२२ टक्‍के इतका राहिला.

तीन हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित
प्रलंबित अहवालांचा आकडा तीन हजारांहून अधिक झाला आहे. सोमवारी सांयकाळपर्यंत तीन हजार १९३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते.

सर्वाधिक दोन हजार ६०३ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात ११८, मालेगावच्‍या ४७२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Supreme Court : पत्नीला खर्चाचा हिशोब ठेवण्यास सांगणे क्रूरता नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

SCROLL FOR NEXT