police recruitment esakal
नाशिक

Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीण पोलीसभरतीसाठी तब्बल 21 हजार अर्ज दाखल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. राज्यातील १४ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख अर्ज आले आहेत. त्यात, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील १७९ जागांसाठी तब्बल एकवीस हजार अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची मैदानी चाचणी येत्या २ जानेवारीपासून सुरू होत आहे. (21 thousand applications filed for Nashik Rural Police Recruitment nashik news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

महाराष्ट्र पोलीस दलात मागील तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया गेल्या ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. दुसरीकडे मनुष्यबळ कमी झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. भरती प्रक्रियेत ९ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर अर्जांसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येत आहेत.

त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची मैदानी चाचणी आडगाव येथील ग्रामीण पोलिसांच्या कवायत मैदानात होणार आहे. २ ते २० जानेवारीपर्यंत ही चाचणी होईल, असे अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले. २ व ३ जानेवारीस चालकपदासाठी व त्यानंतर शिपाईपदासाठी चाचणी सुरु होईल. त्या संदर्भातले वेळापत्रक जाहीर झाले असून, उमेदवारांना कळवण्यात आले आहे.

अशा आहेत जागा

पोलिस शिपाई : १६४
चालक पोलिस : १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT