death esakal
नाशिक

झाडाचा आडोसा ठरला शेवट

कुणाल संत

नाशिक : मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. यावेळी शिवडे (ता.सिन्नर) येथे अंगावर वीज पडल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग येणार आहे. पुढील काही दिवस राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सर्वांकडून दमदार पावसाची वाट पाहिली जात होती. मृग नक्षत्रामध्ये दमदार पाऊस असे सर्वांना वाटत होते. मात्र जिल्ह्यातील काही भाग वगळता संपूर्ण जिल्हा पावसाची वाट पाहत होता. बुधवारी (ता.२२) मृग नक्षत्रातून आर्द्रा नक्षत्रास सुरवात झाल्यानंतर जिल्ह्यातील येवला, बागलाण, कळवण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये दुपारनंतर पावसाने एक ते दीड तास कोसळत जोरदार हजेरी लावली.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळिराजा चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पीक पेरणीला वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या अहवालामध्ये बुधवार दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जिल्ह्यात १.७ मिमि पाऊस पडला आहे. जिल्ह्याप्रमाणेच नाशिक शहरात देखील दुपारी सव्वादोन नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सायंकाळपर्यंत ३० मिमि पावसाची नोंद झाली होती.

झाडाचा आडोसा ठरला शेवट

शिवडे (ता. नाशिक) येथे बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र पवार (वय २१ रा. एकलव्य वस्ती) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र दुपारी शेळ्यांना जनता विद्यालयाच्या पाठीमागे चारण्यासाठी घेऊन गेला. साडेतीन वाजेच्या दरम्यान शिवडे परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. याचवेळी रवींद्र याने एका झाडाखाली आडोसा घेतला असता झाडावर वीज पडली. रविंद्रला त्याचा जोरदार झटका बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT