Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : कार्यकारी अभियंत्यांनी दडविल्या 24 फायली; बांधकाम विभाग क्रमांक तीनची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कामकाजाबाबत तक्रारी असतानाच सहा महिन्यांपासून तब्बल २४ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यारंभ आदेश दिले नसल्याचे उघडकीस आले आहे.

या विभागाबाबत आमदारांच्या वाढत्या तक्रारींमुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या विभागाची झाडाझडती घेतली असता त्यांना कार्यकारी अभियंत्यांच्या कपाटात अंगणवाडी बांधकामाच्या १८ व वर्गखोल्यांच्या सहा अशा २४ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यावाचून फायली पडून असल्याचे दिसून आले. (24 files hidden by Executive Engineer in zp nashik news)

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या कार्यपद्धतीबाबत संबंधित तालुक्यांच्या आमदारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत बदल झाला नव्हता.

यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या तिन्ही कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून त्यांनी या आर्थिक वर्षात राबविलेल्या निविदा प्रक्रिया व त्याबाबत पुढे केलेली कार्यवाही याची माहिती मागितली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी बांधकाम विभाग क्रमांक तीनमध्ये जाऊन अचानकपणे तपासणी केली.

त्यांना तपासणीत कार्यकारी अभियंत्यांच्या कपाटात अंगणवाडी व शाळेच्या मार्चमध्ये मंजुरी दिलेल्या व फक्त कार्यारंभ आदेश देण्यावाचून पडून असलेल्या २४ फायली सापडल्या. या अंगणवाडी व शाळांच्या कामांना सहा महिन्यांपासून कार्यारंभ आदेश न दिल्याने ती कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

आता ही कामे पूर्ण करण्यासाठी केवळ सहा महिने उरले आहेत. याबाबत कार्यकारी अभियंता नलावडे समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी त्या सर्व फायली ताब्यात घेतल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या सुटीवर असून, त्या पुन्हा रुजू झाल्यावर याबाबत अहवाल तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांनी केवळ ठेकेदार भेटण्यास येण्याची वाट पाहण्यात सहा महिने घालविले व कार्यारंभ आदेश दिले नसल्याची चर्चा आहे. कार्यकारी अभियंता यांच्या कामकाज पद्धतीबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्या. आमदारांनीही तक्रारी केल्या. त्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काहीही कारवाई केली नाही. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आता तरी निर्णय घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT