Covid vaccination esakal
नाशिक

नाशिक : covid-19 प्रतिबंधक लसीपासून 24 टक्‍के नागरिक दूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या कोरोना प्रादुर्भाव ओसरत असला तरी संभाव्‍य चौथ्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर लसीकरणाला महत्त्व दिले जाते आहे. अशात शासनाकडून निर्बंध शिथिल करताना यापूर्वी लसीकरणाच्‍या टक्‍केवारीचा निकष ग्राह्य धरण्यात आला होता. सद्यःस्‍थितीत नाशिक महापालिका क्षेत्रात ९५ टक्‍के नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, तर ७६ टक्‍के नागरिकांनी दोन्‍ही डोस पूर्ण केलेले आहेत. सुमारे २४ टक्‍के नागरिक अद्यापही दुसऱ्या डोसपासून दूर आहेत. दुसरीकडे आत्तापर्यंत ३७ हजार ९५२ नागरीकांना तिसरा अर्थात बूस्टर डोस देण्यात आला आहे.

नाशिक महापालिका (nmc) क्षेत्रात गेल्‍या दीड वर्षांपासून लसीकरण (vaccination) केंद्र कार्यान्‍वित आहेत. पहिल्‍या टप्यांत लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागल्‍या होत्‍या. परंतु लसीकरणाचे प्रमाण वाढत असताना गर्दी ओसरली होती. सध्या शहर- परिसरात तीस केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील १३ लाखाहून अधिक नागरीकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. हे प्रमाण सुमारे ९५ टक्‍के आहे. दुसरा डोस घेतलेल्‍या नागरिकांची टक्‍केवारी ७६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ३७ हजार ९५२ नागरीकांनी बूस्‍टर डोस घेतला आहे.

पंचवीस हजार बालकांनी घेतला डोस

१२ ते १४ वयोगटासाठीदेखील लसीकरण खुले करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत सुमारे पंचवीस हजार बालकांनी लसीचा डोस घेतला आहे. शालेय स्‍तरावर लसीकरण शिबिर राबवताना अधिकाधिक बालकांना लसीकरणाचे कवच उपलब्‍ध करून देण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT