dam gangapur.jpg 
नाशिक

जिल्ह्यातील धरणांमध्ये 24 टक्के पाणीसाठा; मात्र 'हे' धरण कोरडेच!

मुकुंद पिंगळे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख...जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाण्याची फारशी टंचाई भासली नाही. गेल्या वर्षी मेअखेरीस धरणांमध्ये 9 टक्के साठा शिल्लक होता. सद्यः स्थितीत धरणांमध्ये 33 टक्के साठा असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 

गेल्या वर्षी 12 धरणे कोरडी 

जिल्ह्यात मोठे सात, तर मध्यम 17 असे एकूण 24 प्रकल्प आहेत. मागील वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला दुष्काळाचे चटके सहन करावे लागले. मात्र, या वर्षी धरणांमध्ये साठा गरजेनुसार उपलब्ध असल्याने पाण्याचा प्रश्‍न भेडसावलेला नाही.  जिल्ह्यातील एकूण 24 धरणांची एकूण साठवण क्षमता 65.8 टीएमसी आहे. त्यांपैकी सद्यःस्थितीत 22 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी पाच टीएमसी पाणी मेअखेरीस शिल्लक होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. मागील वर्षी आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्‍वर, भोजापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्‍या, माणिकपुंज धरणांत साठा संपुष्टात आला होता. यंदा माणिकपुंजमध्ये साठा शिल्लक नाही. 

जमेच्या बाजू 

नोव्हेंबरअखेर पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. रब्बीच्या तोंडावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनसाठा पुरेसा झाला. रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन घटले, तर नंतरचे आवर्तन लांबले. या जिल्ह्याच्या दृष्टीने जमेच्या बाजू राहिल्या आहेत. 

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा (आकडे टीएमसीमध्ये)
धरण साठवणूक क्षमता, गेल्या वर्षीचा साठा, आताचा साठा 

गंगापूर --- 5.630 --- 1.134 --- 2.715 
कश्‍यपी --- 1.852 --- 0.098 --- 0.648 
गौतमी गोदावरी --- 1.868 --- 0.085 --- 0.404 
आळंदी --- 0.970 --- 0.085 
पालखेड --- 0.653 --- 0.070 --- 0.096 
करंजवण --- 5.371 --- 0.896 --- 1.499 
वाघाड --- 2.302 --- 0.021 --- 0.179 
ओझरखेड --- 2.130 --- 0.095 --- 0.868 
दारणा --- 7.149 --- 0.540 --- 4.658 
भावली --- 1.434 --- 0.282 
मुकणे --- 7.239 --- 0.112 --- 2.243                                        वालदेवी --- 1.133 --- 0.246 
कडवा --- 1.688 --- 0.120 
नांदूरमध्यमेश्‍वर --- 0.257 --- 0.101 --- 0.123 
भोजापूर --- 0.361 --- 0.025 
चणकापूर --- 2.447 --- 0.450 --- 0.657 
हरणबारी --- 1.166 --- 0.384 
केळझर --- 0.572 --- 0.060 
नाग्यासाक्‍या --- 0.397 --- 0.072 
गिरणा --- 18.500 --- 1.742 --- 6.186 
पुनंद --- 1.306 --- 0.447 --- 0.350 
माणिकपुंज --- 0.335 
एकूण --- 65.8 5 22.017 

जिल्ह्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पहिल्या आवर्तनाची मागणी कमी राहिली. परिणामी, पाण्याची बचत झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक शिल्लक राहिला. जूनच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी हंगामाच्या आवर्तनाची मागणी आहे. ती पूर्ण करता येईल. - अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता 


यंदा मागील वर्षीच्या तुलनेत शेती सिंचनासाठी असलेली मागणी कमी होती. दर वर्षी रब्बी व उन्हाळ हंगाम मिळून एक टीएमसी पाणी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थांची मागणी असते. मात्र, या वर्षी 10 टक्के घटली. साठा उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे. - शहाजीराव सोमवंशी, संस्थापक संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्था 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT