Sagar Zaware and officers during action against plastic in the market here.
Sagar Zaware and officers during action against plastic in the market here. esakal
नाशिक

Nashik News : येवला नगरपालिकेकडून 25 किलो प्लास्टिक जप्त

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : वारंवार सूचना आणि कारवाई करून देखील बंदी असलेल्या प्लॅस्टिकची सर्रासपणे विक्री होत असल्याने नगरपालिकेच्या वतीने आठवडे बाजारात कारवाईत करत २५ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. शहरामध्ये सिंगल युज प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे. (25 kg plastic seized from Yeola municipality Nashik News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

याबाबतची जाहीर सूचना दुकानदार, विक्रेते व सामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली होती. नगरपरिषदेच्या घंटागाडीवर प्लॅस्टिक बंदीची सूचना दिली होती. तरीही शहरातील अनेक दुकानदार सर्रासपणे बंदी असलेले प्लास्टिक वापर व विक्री करतच असल्याने बुधवारी (ता.२८) नगरपालिकेने मोहीम राबविली. यात शहरातील मेनरोड, भाजी मार्केट, विंचूर चौफुली, आंबेडकर शॉपिंग सेंटर परिसरात जवळपास २५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

सिंगल युज प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील असा इशारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर दिला आहे. सदर कारवाई प्रसंगी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, गोविंद गावंडे, प्रतीक उंबरे, तुषार लोणारी, संदीप बोढरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT