Dnyaneshwar Vispute Bribe Case esakal
नाशिक

Dnyaneshwar Vispute Bribe Case: विसपुतेकडे सापडले 27 तोळे सोने; स्थावर मालमत्तेचा तपासी पथकाकडून शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dnyaneshwar Vispute Bribe Case : चाळीसगाव येथील बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर विसपुते यांना शनिवारी (ता.१६) रात्री नाशिकमध्ये ४ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईनंतर विसपुते यांच्या धुळ्यातील घरात झडतीसत्र राबविण्यात आले असता, पथकाच्या हाती सुमारे साडेचौदा लाखांचे २७ तोळे सोन्याचे दागिने लागले आहेत.

बँक खाते व स्थावर मालमत्तेचा लाचलुचपतच्या तपासी पथकाकडून शोध घेतला जात आहे. (27 tolas of gold found with Dnyaneshwar Vispute investigation team of immovable property searching bribe crime nashik)

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी ८४ लाख रुपये आणि अतिरिक्त सुरक्षेची ३५ लाखांची अनामत रक्कम देण्याच्या मोबदल्यात उपअभियंता ज्ञानेश्‍वर विसपुते याने ५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती ४ लाख देण्याचे ठरले होते. शनिवारी (ता. १६) विसपुते नाशिकला आले असता त्यांनी नाशिकस्थित तक्रारदार ठेकेदाराची भेट घेत लाच मागितली होती. रात्री परत धुळ्यात जात असताना लाचेची रक्कम घेऊन विसपुते याने तक्रारदारास गडकरी चौकात बोलावले होते.

त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई करीत विसपुते यास अटक केली. विसपुते सध्या पोलिस कोठडीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विसपुते यांच्या धुळ्यातील घराची झडती घेतली. या झडतीसत्रात पथकाच्या हाती २७ तोळे सोन्याचे दागिने लागले आहेत. रोख स्वरूपात रक्कम हाती लागली नसली तरी त्यांच्या बँक खात्यांची माहिती पथकाकडून घेतली जात आहे.

त्याचप्रमाणे, विसपुते यांच्या स्थावर मालमत्तेचीही माहिती तपासी पथकाकडून घेतली जात आहे. घरात कोणतीही रक्कम आढळली नसून काही कागदपत्रे आढळलेली नाहीत. विसपुते यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (ता. २०) संपत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT