Akash Lande, Tanishka Pawar, Manthan Kumawath esakal
नाशिक

Nashik CA Foundation Result : CA फाउंडेशन परीक्षेत 273 विद्यार्थी उत्तीर्ण; चमकदार कामगिरी

दी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्‍यातर्फे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्‍या चार्टर्ड अकाउंटंट्‌स फाउंडेशन परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.८) जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik CA Foundation Result : दी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्‍यातर्फे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्‍या चार्टर्ड अकाउंटंट्‌स फाउंडेशन परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.८) जाहीर झाला.

या परीक्षेत नाशिकमधून प्रविष्ट एक हजार ०९३ विद्यार्थ्यांपैकी २७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (273 students passed in CA foundation exam with brilliant performance nashik news)

नाशिकमधून आकाश लांडे, तनिष्का पवार, मंथन कुमावत यांच्‍यासह इतर विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. सनदी लेखापाल (सीए) शिक्षणक्रमासाठी प्रवेश परीक्षा असलेल्‍या सीए फाउंडेशन परीक्षेचे आयसीएआय यांच्‍यातर्फे वर्षातून दोन वेळा आयोजन केले जाते. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्‍या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला.

या परीक्षेला देशभरातून प्रविष्ट झालेल्‍या एक लाख ३७ हजार १५३ पैकी ४१ हजार १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिकमधून आकाश लांडे याने ३२० गुण मिळवताना चमकदार कामगिरी केली. तसेच तनिष्का पवार हिने ३१८ आणि मंथन कुमावत याने ३१२ गुण मिळवताना घवघवीत यश मिळविले आहे. उत्तीर्ण विद्यार्थी सनदी लेखापाल शिक्षणक्रमाच्‍या पुढील टप्प्‍यात प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.

राष्ट्रीय स्‍तरापेक्षा उत्तीर्णांचे प्रमाण कमी

देशपातळीवर सीए फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी २९.९९ इतकी आहे. तर नाशिकमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी २४.९७ टक्‍के इतकी आहे. राष्ट्रीय पातळीवरील उत्तीर्णांच्‍या तुलनेत नाशिकची टक्‍केवारी पाचने कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT