Bribe Crime
Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : जिल्हा हिवताप विभागाच्या महिला अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवकाचे रखडलेले मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप महिला अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. (3 arrested along with woman officer of district heating department Nashik Bribe Crime news)

जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली दगडू पाटील (वय ४९, रा. स्टेटस्‌ रेसीडेन्सी, गंगापूर), संजय रामू राव (वय ४६, रा. पाथर्डी फाटा), कैलास गंगाधर शिंदे (वय ४७, रा. पांडवनगरी) अशी या तिघा लाचखोरांची नावे आहेत.

तर, तक्रारदार हा आरोग्य सेवक असून आजारपणामुळे ते रजेवर होते. त्यानंतर नियमित सेवेत हजर होऊनही जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती पाटील यांनी त्यांचे मासिक वेतन अदा केले नाही.

त्यासाठी वारंवार मागणी केली असता, गेल्या सोमवारी (ता. १५) पाटील यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १७) दुपारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे, तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन गेले असता, श्रीमती पाटीलने आरोग्य सेवक कैलास शिंदे यास ते स्वीकारण्यास सांगितले. त्याप्रमाणे, शिंदे याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली.

अधिक तपासाअंती पथकाने या तिघांनाही अटक केली. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी ही कामगिरी बजावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वेतनाअभावी उपासमार

आजारपणानंतर सेवेत हजर झालेल्या तक्रारदाराने गयावया करून कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगत काम केलेल्या वेतनाची मागणी केली. तरीही लाचखोर पाटीलला दया आली नाही. तक्रारदारास वेतन न मिळाल्याने त्याच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली.

अखेरीस त्यांची पत्नी घर सोडून निघून गेली. जेवणासाठी अन्न नाही, तेव्हा लाचेची १० हजाराची रक्कम कोठून आणायची? असेही त्याने सांगितले.

तरीही लाचेची रक्कम दिली, तरच वेतन काढण्याची भूमिका पाटीलने घेतली. त्यामुळे तक्रारदाराने सुमारे ८ कि. मी. अंतर पायी चालत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठत आपबिती सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT