Murder esakal
नाशिक

Nashik Crime : लग्नासाठी आलेल्या युवकाच्या खुन प्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नातेवाईकांच्या लग्नासाठी घोटी येथे आलेल्या युवकाचा खुन करणाऱ्या तीन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले आहे. (3 arrested in connection with murder of youth nashik crime)

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी ही कामगिरी केली.

दरम्यान, हा गुन्हा घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने या तिघांनाही घोटी पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. संदीप शांताराम निकाळे (वय ३६, रा. भागीरथी पार्क, कात्रप बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), सागर चंदु सोनवणे (वय २७, रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी), अमोल राजाराम पवार (वय ३०, रा. कुऱ्हेगाव, ता. इगतपुरी) अशी संशयितांची नावे असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या स्कार्पिओ गाडीसुद्धा ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घोटी रेल्वे स्टेशन परिसरात नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी टिटवाळा येथून आलेला अनिकेत शिंदे याचा गेल्या १४ मेस मध्यरात्री दीडच्या सुमारास सिन्नर फाटा येथे खुन करण्यात आला होता.

याबाबत गणेश देवीदास जगताप (रा. वसंत पवारनगर, इगतपुरी) यांनी फिर्याद दिली होती. मागील भांडणाची कुरापत काढून खुन करून संशयित फरारी झाले होते. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT