vehicle theft sakal
नाशिक

नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; 3 वाहने लंपास

नाशिक शहरात दुचाकी चोरीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. आडगाव व पंचवटी हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदूर नाका परिसरातून इमारतीच्या पार्किंगमधून भरदिवसा दुचाकी चोरीला गेली.

रवींद्र (रा. मित्तल पार्क, नांदूर नाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीपी- ८५४६) २९ जूनला ते राहत असलेल्या मित्तल पार्क या इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार नरवडे तपास करीत आहेत. पंचवटी हद्दीतील हिरावाडीतून एकाच कॉलनीतून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. विशाल अक्कर (रा. साईविश्‍व रो-हाऊस, शिवकृपानगर, हिरावाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, यांची मोपेड (एमएच- १५- एफवाय- ५१०४) ४ जुलैला मध्यरात्री चोरट्याने चोरून नेली. तर, याच शिवकृपा नगर कॉलनीतून गणेश विधाते याचीही मोपेड (एमएच- १५- एफझेड- ३५८२) चोरट्याने ४ जुलैला मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांचे आव्हान

शहर परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी केली जात असून, कसून तपासणीही होते आहे. असे असतानाही दुचाकी चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दुचाकी चोरटे परजिल्ह्यातून येऊन पसार होत असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच, चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात जाऊन अत्यंत कमी किमतीमध्ये विक्री केली जाते. तरी चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये कमालीची भीती असून, चोरट्यांना आळा घालण्याची मागणी होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS Rally : संघाच्या मिरवणुकीत हातात काठी घेऊन गणवेश घालून सहभाग घेणारा सरकारी अधिकारी निलंबित; राज्यात वादाची ठिणगी!

Nagpur Accident : दुर्दैवी घटना! 'स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू'; कुटुंबियांचा आक्राेश, पार्थ धावला अन्..

ODI ऐवजी T20 मॅच! लंकेला नमवून दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार, भारताची धाकधूक वाढली, टॉप४ चं गणित बिघडणार?

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या चेनापूर तांड्यात 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेतील ‘टीडीआर’ मिळणार ९० दिवसांत; एक नोव्हेंबरपासून आदेशाची अंमलबजावणी हाेणार

SCROLL FOR NEXT