3 burglaries in Nashik city esakal
नाशिक

नाशिक शहरात तीन घरफोड्या; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी तीन घरफोड्या करीत तब्बल पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पहिल्या घटनेत इंदिरानगर परिसरातील कमोद शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील गजेंद्र सेल्स कॉर्पोरेशन नावाचे प्लंबिंग व हार्डवेअरचे संचालक समकित सुरेश राका (रा. गोकुळधाम अपार्टमेंट, गोविंदनगर) यांचे दुकान बुधवारी (ता. ७) मध्यरात्री फोडून २ लाख ४३ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात झाला असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक बारेला या करीत आहेत.


दुसऱ्या घटनेत वडाळा नाका परिसरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने पावणेदोन लाखांची रोकड व दागिने असा १ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. आशा राम आाल्हाटे (रा.नागसेन नगर, वडाळा नाका) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, सहायक निरीक्षक गेंगजे हे तपास करीत आहेत. तर, सिडकोतील हेडगेवार नगरमध्ये अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडीकोयंडा तोडून ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रोहीत अशोक भामरे (रा. हेगडेवारनगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Horoscope Prediction : मार्चमध्ये 4 राशींचं नशीब फळफळणार ! शनी महाराज देणार कष्टाचं फळ

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT