Diliparao Bunker esakal
नाशिक

Nashik News : ओझरच्या विकासकामांसाठी 3 कोटी 60 लाखांचा निधी

दोन योजनेंतर्गत सुमारे तीन कोटी ६० लाख निधीची तरतूद झाली असून, नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नगरपरिषद हद्दीत आमदार दिलीपराव बनकर यांनी शिफारस केलेल्या विविध विकासकामांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय) महाआभियान व दलितेत्तर या दोन योजनेंतर्गत सुमारे तीन कोटी ६० लाख निधीची तरतूद झाली असून, नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. (3 crore 60 lakh fund for development works of Ozar nashik news)

हनुमान टिळकनगरमध्ये सभामंडप, सिद्धिविनायक टाऊनशीप येथील रस्ता दुरुस्ती, शिवाजीनगरमध्ये अंतर्गत भूमिगत गटार करणे, गणेशमंदिर दहावा मैल रस्त्याची दुरुस्ती, चंद्रशेखर असोलकर ते शंकरराव जाधव घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण, सप्तशृंगीनगरमध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, जंजाळे मळा रस्ता सुधारणा, १६ नंबर चारी ते गवळी मळ्यापर्यंत रस्ता सुधारणा.

सायखेडा रोड ते महादेव मंदिर ते निंबाळकर वस्ती रस्ता सुधारणा, आत्मा मलिकनगर अंतर्गत रस्ते सुधारणा, धोंडीराम पगार वस्ती रस्ता सुधारणा, साईधाम येथील रस्त्यांची सुधारणा, महादेवमठ ते गाडेकर वाडी रस्ता सुधारणा, गाडेकर मळा रस्ता सुधारणा, लोहियानगर रस्ता सुधारणा, असा एकूण १५ कामांना सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

दलितेत्तर योजनेंतर्गत महादेवमठ मंदिर येथील रस्ता सुधारणा, आर. के. कॉलनीती रस्ता सुधारणा, महामार्ग क्रमांक तीन ते प्रसाद पार्क येथील रस्ता सुधारणा, विश्वकर्मानगरमध्ये रस्ता सुधारणा, कंजारभाट समाजसाठी स्मशानभूमी बांधणे, असा एकूण पाच कामांना सुमारे ७० लाख रुपयांच्या निधीस प्रसाकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT