death  esakal
नाशिक

Nashik News : आत्महत्येचे सत्र सुरुच... वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आत्महत्येच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी (ता. १४) पुन्हा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्या आहेत. यात एक १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. (3 hanged themselves in different incident nashik news)

सातपूर स्वारबाबानगरमधील धम्म चौकात राहणाऱ्या वैजनाथ उत्तमराव शिंदे (३८) यांनी शुक्रवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्याने मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना नाशिक रोड येथील कैलास लॉजमध्ये घडली. आश्विन चंद्रकांत नानवटकर (२१, रा. त्रिमूर्तीनगर, भंडारा रोड, नागपूर) याने शुक्रवारी (ता. १४) सकाळी नऊच्या सुमारास लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना आडगावात शिवारात घडली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

संजना गोरख वाकळे (१७, रा. श्याम व्हिला अपार्टमेंट, जत्रा हॉटेल, आडगाव शिवार) हिने राहत्या घरात साडीने गळफास घेतला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : भारताकडे स्थिर राजकीय नेतृत्व, मजबूत लोकशाही, सक्षम न्यायव्यवस्था अन् मार्गदर्शक संविधान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

HOROSCOPE: १५ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरू; आर्थिक स्थिती सुधारणार अन् करिअरमध्ये मिळणार मोठं यश, तुमची रास कोणती?

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT