fire by pistol
fire by pistol esakal
नाशिक

Nashik Crime News : गोळीबाराच्या अडीच महिन्यात 3 घटना! शहरवासीयांत भीती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून रविवारी (ता. १९) दिवसा भररस्त्यामध्ये एकावर पिस्तुलीतून फैरी झाडत कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शहरात गेल्या दोन-अडीच महिन्यातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.

शहरात वाढत्या गुन्हेगारी व गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या साऱ्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (3 incidents in two half months of pistol firing Fear among towns people Nashik Crime News)

नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी व पूर्ववैमनस्यातून हाणामाऱ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन-अडीच महिन्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या तीन घडल्या आहेत. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर रात्रीच्या वेळी गोळीबार करण्यात आला होता.

त्यानंतर गेल्या आठवडाभरापूर्वी पंचवटीतील फुलेनगरमध्ये पूर्ववैमनस्यातूनच दोन टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातूनच गोळीबार झाला होता. यात महिला व पाळीव श्‍वान जखमी झाले आहे.

या घटनेतील संशयित अद्यापही फरार असून, पोलिस त्यांना अटक करण्यात अपयशी ठरलेले आहेत. असे असतानाच, रविवारी (ता. १९) पुन्हा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा आणि भररस्त्यावर गोळीबाराच्या फैरी झाडल्याची घटना घडली आहे.

सातपूरमधील आजची घटना सिनेस्टाइलच घडलेली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त वसंत मोरे, सहायक आयुक्त सोहेल शेख व युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ, युनिट दोनचे निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती शाखेचे डॉ. आंचल मुदगल व सातपूर पोलिस दाखल झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या तपनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

कट्टे विक्रीची साखळी शोधावी

शहरात सातत्याने गावठी कट्टे बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून अटक होते आहे. परंतु शहरातील गावठी कट्ट्यांचे वाढते प्रमाण हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरण्याचीच शक्यता आहे.

गावठी कट्टे शहरात येतातच कसे, असा प्रश्‍न निर्माण होत असून केवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई करतानाच त्यांची विक्रीची साखळी शोधून त्यावर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT