Leopard esakal
नाशिक

Nashik News : चिंचखेडला 3 बिबट्यांच्या बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

चिंचखेड (जि. नाशिक) : येथील बहादूर शिवारात माजी सरपंच निवृत्ती मातेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे (Leopard) तीन बछडे आढळून आले. ऊसतोड चालू असताना त्या उसाच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे २५ ते ३० दिवसांचे बिबट्याचे तीन बछडे ग्रामस्थांना आढळून आले. (3 leopard cubs found in sugarcane field in Bahadur Shivar nashik news)

चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक किरण कांबळे, जीवन सतळे यांनी उसाच्या क्षेत्राजवळ जाऊन ग्रामस्थांना त्या बिबट्याच्या बछड्यांपासून दूर केले. त्या बछड्यांचे संरक्षण करून वनविभागाला पाचारण केले.

नाशिक वनविभागाचे उपवन संरक्षक उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे, दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी यांनी घटनास्थळी परिसराची व बिबट्याच्या बछड्यांची पाहणी केली. साधारणपणे एक महिन्यांचे असेल असा अंदाज उमेश वावरे यांनी सांगितले. ग्रामस्थांना या परिसरापासून दूर ठेवले आणि या तीन बछड्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

मादी बिबट्या रात्री साडेदहाच्या दरम्यान कॅमेरात कैद झाली. या पिल्लांना तिने दूध पाजले आणि आपल्या तोंडात एका पिल्लाला घेऊन मादी त्या ठिकाणाहून आपल्या बछड्यांना घेऊन पसार झाली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

बऱ्याच दिवसापासून मादी बिबट्याचा वावर या परिसरामध्ये असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये रात्रीच्या वेळेस गहू हरभरा पिकांना या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नसून भीतीचे वातावरण परिसरात आहे.

चिंचखेडचे पोलिस पाटील सोनवणे यांचे मेंढ्यांच्या कळपामधून दुपारी बाराला बोर नाल्यातून मेंढरू ओढून नेऊन मेंढराचा फरशा पाडला शेत शिवारात तर कुत्र्यांना बिबट्या उचलून नेऊन शिकार करतो. विजेच्या लपंडावामुळे वेळापत्रकानुसार रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्याचे कामे करावे लागतात.

त्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहे. शेतमजूर दिवसा सुद्धा काम करताना घाबरत असल्याने वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कादवा कारखान्याची संचालक रावसाहेब पाटील, त्र्यंबकराव पाटील, सुभाष मातेरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT