pistol esakal
नाशिक

भारम येथे गावठी पिस्तूलासह 3 जिवंत काडतुसे जप्त; एकाला अटक

अवैध अग्निशस्त्र हत्यार शोधमोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : भारम येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत गावठी कट्ट्यासह तीन काडतुसे जप्त केली असून, एका संशयिताला अटक केली आहे.

तालुका परिसरात अवैध अग्निशस्त्र हत्यार शोधमोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील रहाडी भारम रस्त्यावरील भारम बस स्टॉप परिसरात शोधाशोध केली. यावेळी संशयित वाल्मीक दिलीप गांजे (वय २९) याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजारांचा ७.६५ एम. एम. बॅरल असलेला गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे, एक रिकामी पुंगळी, सॅमसंगचा मोबाईल असा ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जिल्ह्यातील मराठवाडा हद्दीच्या लगत असलेल्या भारमसारख्या ग्रामीण भागातील तरुणाकडे कट्टा आला कोठून, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हवालदार उदय पाठक, प्रवीण सानप, पोलिस नाईक प्रशांत पाटील, विश्वनाथ काकड आदींनी ही कारवाई केली. संशयिताला पुढील कारवाईसाठी येवला तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले. शनिवारी (ता. १८) येवला न्यायालयात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक उज्वलसिंग राजपूत पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT