Nashik Bus Accident News esakal
नाशिक

Nashik Bus Accident : बसचालकासह तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार; नातेवाइकांनी हलविले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bus Accident : सप्तशृंगगडावरील घाटरस्त्यावर बुधवारी (ता. १२) सकाळी बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तीन रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (3 patients who were seriously injured in accident were shifted to private hospital nashik bus accident news)

या जखमींमध्ये बसचालक गजानन टपके यांच्यासह दोन महिलांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रवासी रुग्णांच्या नातेवाइकांनी बहुतांश रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी साडेसहाच्या सुमारास खामगाव आगाराच्या बसला गणपती पॉइंटवरील दाट धुक्यांमुळे अपघात झाला होता. त्या वेळी बस थेट संरक्षण कथडा तोडून ४०० फूट खोल दरीत गेली. यामुळे बसमधील एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर चालक-वाहकासह २२ प्रवासी जखमी झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बसचालक गजानन टपके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मेंदूलाही इजा पोचली आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी टपके यांना मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन महिलांनाही त्यांच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात हलविले आहे. या तिन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे.

दहा प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना धुळे येथे घेऊन गेले आहेत. प्रत्येकी एका रुग्णाला जळगाव, नंदुरबार येथे नेण्यात आले आहे. वणी येथील दोन रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

एका रुग्णावर भाभानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व इमर्जन्सी कक्षात प्रत्येकी एक रुग्ण, तर एक रुग्ण ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT