Death News esakal
नाशिक

Nashik News : शहरात तिघांची गळफास घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. यात तिघेही पुरुष असून, एक अवघ्या २८ वर्षांचा आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (3 people committed suicide nashik news)

अंबड परिसरातील डीजीपीनगरमध्ये ४२ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. राकेश संतोष दुसाणे (४२, रा. श्रद्धा अपार्टमेंट, श्रीकृष्णनगर, डीजीपीनगर, अंबड) असे मृताचे नाव आहे. दुसाणे यांनी शनिवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता.

याप्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना गंगापूर शिवारातील शिवाजीनगरमध्ये घडली. किरण हिलाल आहिरे (२८, रा. प्रकाश पाटील मळा, पाझर तलावाजवळ, शिवाजीनगर) यांनी शनिवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या लोखंडी ॲगलला ओढणीने गळफास लावून घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना देवळाली कॅम्प परिसरातील नानेगावात घडली.

बाळू रामचंद्र भवार (४२, रा. आई भवानीनगर, नानेगाव) यांनी शनिवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून घेतला. उपचारासाठी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT