pwd esakal
नाशिक

Nashik News : अंदाजपत्रकात ‘बांधकाम’साठी 3 हजार कोटींचे प्रस्ताव; महापालिका कामकाजात लक्षामुळे कोंडी

बांधकाम विभागासाठी एकूण ३१०० कोटी रुपयांचे प्रस्ताव दिल्याने अंदाजपत्रकाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या आमदार व खासदारांनी निवडणूक वर्ष असल्याने फक्त बांधकाम विभागासाठी एकूण ३१०० कोटी रुपयांचे प्रस्ताव दिल्याने अंदाजपत्रकाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. (3 thousand crore proposal for construction in budget nashik news)

केवळ ‘बांधकाम’साठी इतका निधी आणायचा कुठून? असा प्रश्न पडला असताना दुसरीकडे कामे होण्यासाठी आमदारांमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आमदारांनीही महापालिकेच्या कामकाजात लक्ष घातल्याने कोंडी अधिक वाढली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेकडून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अंदाजपत्रक सादर होणार आहे.

त्यासाठी २० फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. सुमारे २५५० कोटी रुपयांपर्यंत यंदाचे अंदाजपत्रक पोचेल, असा अंदाज प्रशासनाकडून लावला जात असताना दुसरीकडे बांधकाम विभागासाठी शहरातील तीन आमदारांसह ग्रामीण भागातील काही आमदार व खासदारांनी महापालिका हद्दीत कामे करण्यासाठी प्रस्ताव सादर केले.

या आर्थिक वर्षामध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आमदार खासदारांनी लक्ष घातले आहे. बांधकाम विभागाशी संबंधित प्रस्ताव दाखल झाले आहेत. बांधकाम विभागाला तीनशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रके तरतूद करण्याचे नियोजन असताना तब्बल तीन हजार शंभर कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यामुळे २० फेब्रुवारीचे नियोजन पुढे ढकलले जाणार आहे.

ना हरकत दाखला घेणारे निधीत वाटेकरी

मागील दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. प्रशासनामार्फत अंदाजपत्रक तयार करताना आमदारांकडून सुचविलेली कामेही ग्राह्य धरली जातात. मात्र मागील दोन वर्षांत आमदारांनी महापालिकेकडून काम न करता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करून घेतली आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त ना हरकत दाखला देण्याचे काम शिल्लक राहिले. परंतु आता महापालिकेकडून फक्त ना हरकत दाखला घेणारे आमदार व खासदारांनी मात्र महापालिकेच्या निधीतूनही तीन हजार कोटींपेक्षा अधिक किमतीचे प्रस्ताव दिल्याने आमदारांचा दुटप्पीपणा चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT