Jailed esakal
नाशिक

Nashik Crime: पत्नीचा छळ करणाऱ्या अभियंत्यास 3 वर्ष कारावास

अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी हा निकाल दिला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणले नाहीत म्हणून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत जीवे ठार मारण्याचा दम दिल्याच्या आरोपावरून संगणक अभियंता असलेल्या आरोपी मुस्तफा समशुद्दीन पिंजारी (वय २८, रा. धुळे) याला येथील न्यायालयाने तीन वर्षे कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी हा निकाल दिला. (3 years imprisonment for engineer who tortured his wife Nashik Crime)

फरहीन मुस्तफा पिंजारी (रा. मालेगाव) हिचा धुळे येथील मुस्तफा समशुद्दीन पिंजारी याच्याशी विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच मुस्तफाने पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी २० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी सातत्याने फरहीनकडे करीत तिचा छळ करण्यास सुरवात केली.

अखेर छळ सहन न झाल्याने याप्रकरणी आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खटला न्यायालयात पाठविला. न्यायाधीश संधू यांच्या समोर या खटल्याचे कामकाज चालले.

सरकार पक्षातर्फे ॲड. नसरीन मेमन, ॲड. धीरज चव्हाण यांनी तर फिर्यादी फरहीन मुस्तफा यांच्यातर्फे ॲड. सुधीर अक्कर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने २० लाखाची बेकायदेशीर मागणी केली.

मुस्तफाला फरहीन हिच्यापासून बिनश (वय ८) मुलगी असताना तिच्या भविष्याचा विचार न करता फरहीनला तलाक देत आरोपी मुस्तफा याने दुसरा विवाह केला.

न्यायालयाने साक्षीदारांच्या साक्ष व सर्व घटनाक्रमांचा विचार करून न्यायाधीश संधू यांनी मुस्तफा पिंजारी यास तीन वर्ष सश्रम कारावास, वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT