3 youths traveling from Mumbai to Shirdi on a two wheeler died in an accident nashik marathi news 
नाशिक

दुचाकीवरुन शिर्डीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत तिघे ठार

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि. नाशिक) : मुंबईहून- शिर्डीला दुचाकीवरून जाणारे चौघे लेखानगर येथे ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले. दरम्यान यातील तिघे ठार झाले. तर एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अंबड पोलिसांत अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

मुंबईहून नीलेश नंदकिशोर धावडे (वय २२, रा. विलेपार्ले, मुंबई), सिद्धार्थ भगवान भालेराव (२२), वैजनाथ जालिंदर चव्हाण (२१), आशिष महादेव पाटोळे (१९) व अनिश अरुण वाकळे (१७, सर्व रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्यासह त्यांचे मित्र दुचाकीवरून शिर्डीकडे जात होते. नीलेश आणि त्याचा मित्र सिद्धार्थ दुचाकी (एचएच ०२, एफएच ०६१०)वरून, तर आशिष, अनिश व वैजनाथ हे दुचाकी (एमएच ०२, एफडी ४२४८)वरून जात होते. 

नेमके काय घडले?

लेखानगर येथून उड्डाण पुलावर शनिवारी (ता. २) रात्री पाऊणच्या सुमारास वैजनाथ यांच्या दुचाकीला एका गाडीचा धक्का लागल्याने ते दोन्ही युवक खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकचा वेग नियंत्रित न झाल्याने या ट्रकखाली येऊन चौघेही युवक गंभीर जखमी झाले. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही जणांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैजनाथ चव्हाण, सिद्धार्थ भालेराव, आशिष पाटोळे यांना मृत घोषित केले. तर अनिश याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नीलेश धावडे याच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राकेश शेवाळे तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT