300 eye infection patients were registered during day on Tuesday nashik news sakal
नाशिक

Nashik Eye Infection : डोळ्यांच्या रुग्णांत सातत्याने वाढ; शहरात 300 डोळ्यांचे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Eye Infection : शहरात डोळ्यांची साथ कायम असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली आहे.

डोळ्यांच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने महापालिका यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे. (300 eye infection patients were registered during day on Tuesday nashik news)

गेल्या पाच दिवसापासून डोळ्यांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालय, बिटको रुग्णालय, डॉक्टर झाकिर हुसेन रुग्णालय, तसेच इंदिरा गांधी रुग्णालयाच्या अहवालानुसार मंगळवारी तीनशे रुग्णाची नोंद झाली आहे. २७ जुलैला शहरात १४४, तर २८ जुलैला १५६ रुग्णांची नोंद झाली होती.

२९ जुलैला १७९, तर ३० जुलैला २५६ डोळ्याचे रुग्ण होते. १ ऑगस्टला तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात डेंगीचे ३१ रुग्ण आढळले असून आतापर्यंत डेंगी बाधितांचा आकडा १४७ पर्यंत पोचला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मलेरिया विभागाने डेंगी उत्पत्ती स्थाने शोधताना शासकीय कार्यालयांनादेखील नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे. मलेरिया विभागांकडून सेंट्रल जेल, आयएसपी, महावितरण, जिल्हा परिषद कार्यालय यासह १५९ शासकीय आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहे.

डेंगींची अळी आढळल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसात खुलासा मागवण्यात आला आहे. डेंगी अळी आढळल्यास दोनशे रुपये दंड आकारणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT