Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News esakal
नाशिक

Nashik News : दलित वस्तीच्या विकासकामांना 31 कोटींचा निधी!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेंतर्गत ३१ कोटी रुपयांची ६७ विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.

३४ गावांमध्ये दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण,भूमिगत गटार, समाजमंदिर विकास, पाणीपुरवठा, पाइपलाइन, पेव्हर ब्लॉक यांसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. (31 crores fund for the development of Dalit slums chhagan bhujbal Nashik News)

या माध्यमातून तालुक्यातील २९ कोटी पाच लक्ष २० हजार रुपयांची विकासकामे, तर निफाड तालुक्यात दोन कोटी दाह लक्ष ४७ हजार विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या मूलभूत सुविधांचा नागरिकांना फायदा होणार असून, दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार आहे.

येवला तालुक्यातील अनकुटे येथे पगारे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ८ लक्ष, भाटगाव धानोरे कांबळे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष, जगताप वस्ती सार्वजनिक शौचालयासाठी ५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

बाभूळगाव बुद्रुक येथे बनसोडे वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, चिचोंडी खुर्द बदापूर येथे बोराडे भालके वस्ती, राजवाडा येथे भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ५ लक्ष, भीमनगर दलितवस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण १० लक्ष, भीमनगर दलितवस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, धुळगाव खंडेराव नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, खंडेराव नगर व भीमनगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, भीमनगर येथे समाजमंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८ लक्ष, कांबळे वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ८ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

धामणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी दहा लक्ष, धामोडे रमाईनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ७ लक्ष, गुजरखेडे आंबेडकरनगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ३ लक्ष ५६ हजार, गारखेडे रमाईनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष, खैरगव्हाण रमाई नगर दलितवस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लक्ष, भीमनगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी २ लक्ष,

ममदापूर रमाईनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी ८ लक्ष, महालखेडा आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लक्ष, मातुलठाण राजवाडा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ९ लक्ष, मुखेड अण्णाभाऊ साठेनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, नगरसूल रेल्वेस्टेशन परिसरात पेव्हर ब्लॉक व रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ८ लक्ष,

नगरसूल बागुल वस्ती येथे भूमिगत गटार करण्यासाठी ६ लक्ष ९८ हजार, रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ६ लक्ष ४ हजार, अण्णाभाऊ साठे नगर भूमिगत गटार करण्यासाठी ६ लक्ष ९८ हजार, रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

तसेच नागडे आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, न्याहारखेडे खु रेंडाळे राजवाडा येथे भूमिगत गटार करण्यासाठी ७ लक्ष, राजापूर आंबेडकरनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ९ लक्ष,

अण्णाभाऊ साठे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष ८३ हजार, सावरगाव रोहिदास नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लक्ष, सत्रे आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, साताळी गायकवाड वस्ती येथे तीन रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ५ लक्ष,

अंगणगाव राजवाडा येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, जळगाव नेऊर राजवाडा येथे पाण्याची टाकी व पाईप लाईन करण्यासाठी ५ लक्ष, रहाडी आंबेडकर नगर येथे पाईपलाईन करण्यासाठी १६ लक्ष ६५ हजार रुपये असे एकूण २९ कोटी ५ लक्ष २० हजार रुपयांचा निधीस मंजुरी मिळाली आहे.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर रोहिदासनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, रमाई नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष, एकलव्य नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी २ लक्ष, आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

धरणगाव खडक येथे डॉ.बाबासाहेब आबेडकर नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ६ लक्ष, रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १२ लक्ष, देवगाव आंबेडकर नगर, गौतम नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ५ लक्ष, रमाईनगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी १० लक्ष, मरळगोई खु राजवाडा येथे समाजमंदिर दुरुस्तीसाठी १ लक्ष, भूमिगत गटार करण्यासाठी १४ लक्ष, रोहिदास नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

पिंपळगावनजीक येथे पंचरत्ननगर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, देविका नगर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, गोपी नगर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ६ लक्ष, इंदिरानगर २ येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, रुई धानोरे सिद्धार्थ नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ७ लक्ष, आंबेडकरनगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी १३ लक्ष, पंचशील नगर येथे पाईप लाईन टाकण्यासाठी ६ लक्ष ९७ हजार,

सारोळे खु राजवाडा येथे भूमिगत गटार करण्यासाठी १० लक्ष, टाकळी विंचूर येथे आठ बारा बंगले येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ७ लक्ष ५० हजार, संधान नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष, राजवाडा १ येथे भूमिगत गटार करण्यासाठी १५ लक्ष तर कानळद रमाई नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ लक्ष असा एकूण २ कोटी १० लक्ष ४७ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT