NMC Latest marathi news esakal
नाशिक

Nashik : आपत्कालीन कक्षात 7 दिवसात 35 तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागीय कार्यालयाच्या आपत्कालीन कक्षेत (Emergency Department) गेल्या सात दिवसात ३५ तक्रारी दाखल झाल्या आहे. त्यात सर्वाधिक तक्रारी ड्रेनेजबाबत (Drainage) होत्या. शिवाय पश्चिम विभागाच्याही अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने त्या संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. (35 complaints in 7 days in emergency deaprtment Nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून (NMC) पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती निमित्ताने सहाही विभागीय कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपत्कालीन कक्ष निर्माण करण्यात आले आहे.

तीन टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती कक्षात करण्यात आली आहे. कक्षामार्फत वेळेत संबंधित विभागांना माहिती देत तक्रारी निकाली काढल्या जात आहे. पूर्व विभागीय कार्यालयातील आपत्कालीन कक्षात गेल्या सात दिवसात अर्थात गुरुवार (ता. ७) ते बुधवार (ता. १३) पर्यंत विविध भागातील सुमारे ३५ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यात सर्वाधिक १५ तक्रारी ड्रेनेजबाबत होत्या.

पावसामुळे ड्रेनेजमध्ये कचरा अडकून ड्रेनेजचे पाणी घरात परिसरात साचत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे घर, वृक्ष कोसळणे, रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य, पावसाचे पाणी साचणे अशा विविध तक्रारींचा समावेश आहे.

तक्रार प्राप्त होताच संबंधित विभागास माहिती देत तक्रारी निकाली काढल्या जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. आपत्कालीन कक्ष असल्याने अन्य विभागाच्या तक्रारीदेखील प्राप्त होत असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा तक्रारी त्या विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहे. पश्चिम विभागाच्या तक्रारी अधिक प्रमाणात प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT