experimental farmers resource bank 
नाशिक

प्रयोगशील शेतकऱ्यांच्या 'रिसोर्स' बँकेत नाशिकचे 362 शेतकरी; राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय केले जातात. त्याअंतर्गत शेतीत नावीन्य प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची 'रिसोर्स बॅंक' तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाचे कृषिरत्न, कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसह पिकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.
    
शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारे अभियान तालुकास्तरावर राबवावे असे निर्देश गेल्या फेब्रुवारीत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिले होते.

राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक

राज्यात अनेक शेतकरी परिस्थितीशी मुकाबला करत शेतीत आमुलाग्र बदल करणारे नाविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला यश देखील येत असल्याने कृषी उत्पादनात सकारात्मक वाढ देखील होताना दिसते आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादाय यशोगाथा बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांना फायदाच होईल. त्यासाठी फळ पिके, भाजीपाला यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात यावी अशी सूचना कृषीमंत्र्यांनी केली होती.  फेब्रुवारी 2021 अखेरीस अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून कृषी प्रात्यक्षिक व प्रशिक्षणासाठी ती वापरात आणावी असेही भुसे यांनी म्हटले होते. त्यानुसार राज्यातील 5009 प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, सेंद्रियशेती कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसह शासनस्तरावर आयोजित पिकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील 1405 पुरस्कारार्थी शेतकरी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या 3604 शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जात तेथील शेतीप्रयोग जवळून बघण्याची संधी या निमित्ताने इतर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नाशिक विभागातील 742 शेतकरी

राज्याच्या कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांची रिरोर्स बँक यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून नाशिक विभागातील 234 पुरस्कारार्थी व 508 नाविन्यउपक्रम राबवणाऱ्या शेतकरी यात समाविष्ठ आहेत. नाशिक- 113 पुरस्कारार्थी, 249 नावीन्यउपक्रम , जळगाव- 44 पुरस्कारार्थी, 83 नावीन्यउपक्रम , नंदुरबार- 32 पुरस्कारार्थी, 100 नावीन्यउपक्रम , धुळे- 45 पुरस्कारार्थी व 76 नावीन्यउपक्रम शेतकऱ्यांचा जिल्हानिहाय समावेश करण्यात आला आहे.

नवे प्रयोग राबवणारे व पुरस्कारप्राप्त शेतकरी सुरुवातीपासूनच सहकार्य करत आले आहेत. रिसोर्स बँकेमुळे राज्यातील अशा शेतकऱ्यांची यादी अद्ययावत झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात खरीप हंगामात या शेतकऱ्यांची मदत घेऊन शासन योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. आता देखील रब्बी हंगामासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. नावीन्यप्रायोग करणाऱ्या शेतकऱ्यांकडून इतरांना प्रेरणा मिळेल.
- संजय पडवळ, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी (नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : शिरोलीत मिरवणुकीत होमगार्डला धक्काबुक्की; पोलिस अधिकारी सुनील गायकवाड, शशिकांत खवरे यांच्यात वादावादी

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

SCROLL FOR NEXT