lok adalat 
नाशिक

जिल्ह्यात लोकअदालतीत तीन हजार ९४४ प्रकरण मार्गी; २५ कोटी ८९ लाखांच्या तडजोडी 

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीत तीन हजार ९४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, यात २५ कोटी ८९ लाख ७० हजार रुपयांची तडजोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी प्राधिकारणातर्फे देण्यात आली. 

राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार आज जिल्हाभरात लोकअदालती झाल्या. जिल्हा न्यायालयात प्रमुख न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्‍घाटन करण्यात आले. दिवसभर विविध न्यायालयात कोरोना संर्सग टाळण्याचे नियम पाळून लोकअदालतीचे कामकाज झाले. त्यात जिल्हाभरातील प्रलंबित प्रकरणांपैकी सात हजार ३१० प्रकरणे ठेवण्यात आली होती. दावा पूर्व दाखल प्रकरणांमधील २० हजार २४६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. कलम १३८ ची ९२६, फौजदारी ३८७, बँकेची ७१, मोटारवाहन १४७, कामगारविषयक चार, कौटुंबिक वादाची ८८, भूसंपादनाची सहा व दिवाणी १०१ अशी एक हजार ७३० प्रकरणे यात निकाली निघाली. दावा दाखल पूर्व दोन हजार २१४ प्रकरणे निकाली निघाली. अशाप्रकारे एकूण तीन हजार ९४४ प्रकरणे निकाली निघाली, तर २५ कोटी ८९ लाख ७० हजार २९७ रुपयांच्या रकमेची तडजोड होऊन रक्कम वसूल करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी लोकअदालतीत सहभागी सर्व न्यायाधीश, अधिकारी, वकील व पक्षकारांचे आभार मानले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT