crime Sakal
नाशिक

नाशिक शहरात 2 घरफोड्यांत चार लाखांचा ऐवज लंपास

विनोद बेदरकर

नाशिक : दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी चार लाखांच्या घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. वासनगरला अडीच लाखांची, तर गंगापूर रोडला दीड लाखांची घरफोडी झाली. वासननगर परिसरातील शिवलेख अपार्टमेंटमध्ये घरफोडी करीत सुमारे अडीच लाखांची घरफोडी झाली.

संजय रमेश जवरे (३६) यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ३० हजाराची रोकड, सोन्याचा हार, २ तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन, ८ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याचे कर्णफुले, दोन चांदीचे पैंजण, असा अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

दुसऱ्या घटनेत वॉचमनच्या केबिनमध्ये घुसून चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचे दागिने चोरले. याप्रकरणी केशव मधुकर काळे (४१, शिवसृष्टीनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. केशव काळे हे प्रसाद अपार्टमेंटचे वॉचमन आहे. सोमवारी (ता. २८) सकाळी केबिन रूममधील लाकडी कपाटातून चोरट्यांनी ६० हजाराची सोन्याची पोत, ५० हजाराची रोकड आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४ ग्रॅमच्या कानातील साखळी, ४ ग्रॅम सोन्याचे वेल असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT