Exam
Exam esakal
नाशिक

UPSC Combined Preliminary Examination: यूपीएससीच्या संयुक्‍त पूर्व परीक्षेला 4 हजार 458 उमेदवारांची दांडी

सकाळ वृत्तसेवा

UPSC Combined Preliminary Examination : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता.४) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२३ घेण्यात आली. काठीण्य पातळीबाबत उमेदवारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्‍या होत्‍या.

दरम्‍यान प्रविष्ठ असलेल्‍या १५ हजार ७७९ पैकी ४ हजार ४५८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. अनुपस्‍थितीचे प्रमाण २८.२५ टक्‍के राहिले. (4 thousand 458 candidates absent for UPSC Combined Preliminary Examination nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर ११ हजार ३२१ परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे गेले आहेत. आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेच्‍या माध्यमातून विविध शासकीय सेवांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पहिल्‍या टप्‍यात रविवारी पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर विविध सूचना दिलेल्‍या होत्‍या. या परीक्षेच्‍या माध्यमातून एकूण ६७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते आहे.

रविवारी नाशिक जिल्‍ह्‍यात ४२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. पेपर क्रमांक एकची काठीण्य पातळी काही प्रमाणात अधिक राहिल्याचे उमेदवारांनी सांगितले. विशेषतः गणित विषयाशी निगडित प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ लागत होता. दोन सत्रात झालेल्‍या या परीक्षेत वेळेत सर्व प्रश्‍न सोडवितांना बहुतांश उमेदवारांची दमछाक झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT