'Koyta Bandh' movement of sugarcane workers from today jalgaon labourers strike news esakal
नाशिक

Nashik Anganwadi News: 5 हजार अंगणवाड्या झाल्या मुक्या; जिल्ह्यात सेविका, मदतनीसांच्या बेमुदत संपांचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Anganwadi News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे ४ डिसेंबरपासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सुरू आहे.

यात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका सहभागी असल्याने सर्व कामकाज बंद असून, जिल्ह्यात चार हजार ७०० अंगणवाड्या गेल्या २१ दिवसांपासून कुलूपबंद असल्याने चिमुकल्यांचा किलबिलाट मुका झाला आहे. (4 thousand 700 Anganwadis in district have been locked due to strike nashik news)

एकीकडे प्रचंड महागाई अन् दुसरीकडे तुटपुंजे मानधन, अशा कैचीत अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका व मदतनीस सापडल्या आहेत. तुटपुंजे मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा, हा एक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. अनेकदा आंदोलने करूनही शासनाने दखल घेतलेली नसून आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या संपामुळे ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना आहार व आरोग्य, आहार व अनौपचारिक शिक्षण मिळत नाही. किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी आहार, आरोग्यापासून वंचित आहेत. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा, पोषक आहार पुरविण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

अंगणवाड्या कुलूपबंद

आंदोलनाची कोंडी फुटत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे चार हजार ७०० अंगणवाड्या कुलूपबंद आहेत. यामुळे जेथे रोज चिमुकल्या मुलांच्या किलबिलाटाने अंगणवाड्या फुलून जायच्या तेथेच गेल्या २१ दिवसांपासून परिसर मुका झाला आहे. सुमारे ८ हजार ९३९ मदतनीस व सेविका संपात सहभागी असून, यामुळे तीन लाख बालके आहार व आरोग्य सुविधेपासून वंचित राहिले आहेत.

"अंगणवाडीसेविका व मदतनिसांना तुटपुंज्या मानधनावर घरखर्चसुद्धा भागवणे मुश्कील आहे. शासनाने किमान वेतन द्यावे, मोबाईल व नेटचे पूर्ण रिचार्ज द्यावे, कर्मचारी दर्जा देऊन मानधन वाढवावे, मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे, मुख्य सेविका व पर्यवेक्षिका भरती करत असताना कार्यान्वित असलेल्या सेविकांना प्राधान्य द्यावे, गणवेश व सादिल खर्चाची वाढीव रक्कम मिळावी, मुलांसाठी सुधारित आहार मिळावा, तसेच सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे. शासनाने आम्हाला न्याय द्यावा." - जिजाबाई जगझाप, अध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी संघ, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking! CM On Mahadevi Elephant : माधुरी हत्तीसाठी मुख्यमंत्र्यांचा शब्द, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात होणार पक्षकार

Kharadi Rave Party : प्रांजल खेवलकरांच्या जामीनासाठी अर्जच नाही, कारण काय?

Latest Maharashtra News Updates Live : नांदणीच्या महादेवीसाठी गडहिंग्लजमध्ये जोरदार मोर्चा

अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांचा 'कार'नामा आला समोर; आमदार नसतानाही गाडीवर लावला 'आमदार लोगो', प्रशासनाकडून कारवाई होणार?

Education News: राज्यातील २१ लाखांहून अधिक अकरावीच्या जागांपैकी ८.८२ लाख प्रवेश निश्चित; खुल्या फेरीकरिता आजच भरा अर्ज

SCROLL FOR NEXT