Leopard News esakal
नाशिक

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील ब्राम्हणवाडे येथे 4 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

ज्ञानेश्वर मेढे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुनः हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे.

दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याच्या दहशती खाली येथील नागरिकांना जगावं लागत असताना, अश्यात वेळूजे येथील बिबट्याने एका लहान मुलाला ठार केले असल्याची घटना ताजी असतांनाच आज पुनः एकदा ब्राम्हणवाडे येथील शेतावर राहणाऱ्या कुटुंबातील एक 4 वर्ष्याच्या मुलीचा बिबट्याने पळवून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (4 year old girl died after being attacked by leopard in Trimbakeshwars Bramhanwade Nashik News)

अधिक माहिती अशी कि ब्राम्हणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची 4 वर्ष्याची मुलगी नयना हिला बिबट्याने घराच्या अंगणातून नेले असून, घरात समजल्यावर आजूबाजूला शोध घेण्यात आला, गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता.

अखेर शेतात मृत अवस्थेत मिळून आली, वानविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता, घटना स्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्र्यंबक पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे सह त्यांचे कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनेची सखोल माहिती घेण्यात आली,परिसरातून सदर घटनेची हळहळ व्यक्त केली जात असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सद्या तणावाचे वातावरण असून वानविभागाला येथील स्थानिक नागरिक यांनी धारेवर धरले आहे, मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदणासाठी हलवण्यात आले आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT