File Photo esakal
नाशिक

Nashik News: नवीबेज शिवारात 400 कोंबड्यांचा मृत्यू; पोल्ट्रीफार्मच्या टाकीत विषारी औषध, दीड लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नवीबेज शिवारात अज्ञात व्यक्तीने पोल्ट्रीफार्मच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने चारशे पक्षी (कोंबड्या) मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली असून पोल्ट्रीफॉर्ममधील बाकीचे पक्षी अस्वस्थ आहे.

पोल्ट्रीचे मालक सचिन रौंदळ यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत संशयिताविरोधात श्री. रौंदळ यांच्या तक्रारीवरून कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (400 hens die in Navibej Shivara Poisonous drug in poultry farm tank loss of one half lakhs Nashik News)

कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारातील शेतकरी सचिन रामचंद्र रौंदळ गट नं १९०/ २ मध्ये २ पोल्ट्रीशेड आहेत. दोन्ही शेडमधून चार हजार ८८० कोंबडी पिल्लांचे संगोपन करीत होते. २ नंबरच्या शेडमधील गेटची जाळी तोडून अज्ञात व्यक्तीने पोल्ट्रीफार्मच्या पाण्याच्या टाकीत रात्री विषारी औषध टाकल्याने दोन हजार ४०० पक्षी (कोंबड्यांना) विषबाधा झाली.

त्यापैकी चारशे पक्षी मृत्यू झाले आहे. श्री. रौंदळ यांचे जवळपास एक दीड लाखांचे नुकसान झाले आहे. सचिन रौंदळ कुक्कुटपालन व्यवसायाबरोबरच शेती व्यवसाय करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गट नं. १९०/२ मध्ये २००५ पासून करार पद्धतीने पोल्ट्रीफॉर्म सुरु केले आहे. सध्या दोन्ही पोल्ट्रीफॉर्ममध्ये एका खासगी कंपनीकडून दोन शेडमधील चार हजार ८८० पक्ष्यांचे पालनपोषण सुरु होते. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञाताने पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्यामुळे २ नंबरच्या शेडमधील चारशे कोंबड्या मृत झाल्या.

तर बाकीचे पक्षी (कोंबडी) अस्वस्थ आहेत. कोंबड्याच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याने या कोंबड्या देखील मृत होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT