42 crores fund for development works in Sinnar constituency of MLA Kokate nashik news esakal
नाशिक

MLA Kokate : सत्तेत सहभागानंतर 42 कोटींचा निधी, आमदार कोकाटेंच्या सिन्नर मतदारसंघातील विकासकामांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना समर्थन देत सरकार मध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय मतदारसंघाच्या दृष्टीने फळाला आला असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४२ कोटींची विकास कामे मंजूर करून घेण्यात कोकाटे यांना यश आले आहे. त्यातून रस्ते,मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये आदींची कामे होणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली दोन वर्षे कोरोनात गेल्याने पाहिजे तसा निधी विकास कामांसाठी मिळू शकला नव्हता. अशा अवस्थेतही आमदार माणिकराव कोकाटे यांनी विकास कामांसाठी निधी मिळवला. (42 crores fund for development works in Sinnar constituency of MLA Kokate nashik news)

नंतरच्या काही महिन्यात गाडी रुळावर आली असतांना सरकार पडले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधकांना निधी देईना. विरोधी सदस्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर मर्यादा येऊ लागल्या. असे असतांना अजित पवारांनी सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला. या निर्णयाचा फायदा महिनाभराच्या आतच झाला असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विविध रस्त्यांच्या कामांसाठी आमदार कोकाटे यांना ४२ कोटी एवढा निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे.

वावी घोटेवाडी या ५ किमी रस्त्यासाठी- ३ कोटी,पंचाळे ते मेंढी रोड -५० लक्ष,पंचाळे ते दहिवाडी रोड -५० लक्ष, पंचाळे ते मिरगाव रोड -५० लक्ष, चास ते ठाकूरवाडी रोड -५० लक्ष, मऱ्हळ ते म्हस्के वस्ती रोड-५० लक्ष, मानोरी ते निमोण जिल्हा हद्द रोड-५० लक्ष,कोनांबे ते पापळ्याचीवाडी रोड-५० लक्ष, मिरगाव-मिठसागरे,पिंपरवाडी रोड- ५० लक्ष, पांगरी ते धारणगाव-देवपूर रस्ता- ५० लक्ष, सांगवी-खोलवाट रोड- ५० लक्ष.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंचाळे-भोकणी रोड -५० लक्ष, शिवडे ते भैरवनाथ रोड-५० लक्ष, पाटोळे, गोंदे, भोकणी, देवपूर, सांगवी या रस्त्याच्या २५ ते २७ किमी दरम्यानच्या कामासाठी २ कोटी रुपये, सोमठाणे, पंचाळे, दापुर, ठाणगाव या रस्त्याच्या ७३ ते ७६ किमी दरम्यानच्या कामासाठी ३ कोटी रुपये, उजनी, वडांगळी, निमगाव, सिन्नर या रस्त्याच्या १८ ते २७ किमी दरम्यानच्या कामासाठी ६ कोटी रुपये, निमगाव, सिन्नर, शहा, कोळपेवाडी रोड वर १० किमी वर पूल बांधण्यास ५ कोटी रुपये असा एकूण १६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

आदिवासी उपाययोजनांतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटींचा निधी..

मतदारसंघातील टाकेद गटातील आदिवासी बहुल भागातील १३ रस्त्यांसाठी आमदार कोकाटे यांनी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यात इंदोरे ते माळवाडी रस्त्यासाठी १ कोटी, काननवाडी ते भल्याची वाडी रस्त्यासाठी ७० लक्ष, भंडारदरवाडी फोडसेवाडी रस्त्यासाठी ७० लक्ष,

आंबेवाडी ते नांदुरखी पाडा रस्त्यासाठी ५० लक्ष, अडसरे खु ते गोसावीवाडी रस्त्यासाठी ५० लक्ष, इंदोरे ते देवाचीवाडी कॉलनी रस्त्यासाठी १० लक्ष, इंदोरे ते जाधववाडी रस्त्यासाठी १० लक्ष, बेलगाव तऱ्हाळे ते तातळवाडी रस्त्यासाठी ७० लक्ष, ठोकळवाडी रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी, वासाळी ते ठाकूरवाडी रस्त्यासाठी ७० लक्ष, मांजरगाव ते मांजरगाव फाटा रस्त्यासाठी २ कोटी, मांजरगाव ते गोडसेवाडी भाग १ साठी ७० लक्ष व २ साठी ७० लक्ष, मांजरगाव ते बोरवाडी रस्त्यासाठी ५० लक्ष असा एकूण ९ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

मंडळाधिकारी आणि तलाठी कार्यालयांसाठी ६ कोटी ९० लाख

सिन्नर तालुक्यातील ७ गावांत मंडळाधिकारी व ३९ गावांत तलाठी कार्यालयांसाठी निधी मंजूर करून आणण्यात आमदार कोकाटे यांना यश आले असून त्यासाठी ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गोंदे,वावी,नायगाव,वडांगळी,पांगरी बु,सोनांबे,पांढुर्ली या ठिकाणी मंडळाधिकारी कार्यालये बांधण्यात येणार आहेत.

तर शिवडे, मोहू, हरसुले, जामगाव, पाटपिंप्री, पाटोळे, हिवरे, शिवाजी नगर, दोडी बु, वावी, मऱ्हळ बु, मिरगाव,रामपूर, धारणगाव, गुळवंच, कीर्तांगळी, फुलेनगर, पिंपळगाव, भैरवनाथ नगर सिन्नर, सिन्नर दक्षिण, घोरवड, आगासखिंड, सोनांबे, पास्ते, ब्राह्मणवाडे, माळेगाव, आशापूर, गोंदे,सोनेवाडी, कणकोरी, मऱ्हळ, कहांडळवाडी, भरतपूर, पाथरे खु, निमगाव देवपूर,खोपडी खु, खंबाळे, मेंढी, विजय नगर सिन्नर या ३९ ठिकाणी तलाठी कार्यालये बांधण्यात येणार आहेत.

घेतलेल्या निर्णयामुळे फायदा..

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी घेण्यात आला.घेतलेला निर्णय सार्थकी लागत असल्याचे दिसून आले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४२ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.

अजून अनेक विभागांतून कामे मंजूर होणार असून पुढील काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना आणखी निधी मंजूर झालेला दिसेल.लोकप्रतिनिधींची बांधिलकी जनतेशी असते आणि विकास कामांच्या माध्यमातून ती जपली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT