Cyber Fraud Sakal
नाशिक

Nashik Cyber Fraud: सोन्यात गुंतवणूक करणे पडले महाग; सायबर भामट्याने घातला 43 लाखांना गंडा

प्रविण एकनाथ वंजारी (रा. दातेनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात व्हॉटसॲप क्रमांकावरून त्यांच्या व्हॉटसॲपवर संपर्क साधला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Fraud : सोशल मीडियावरून संपर्क साधून सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने एकाला तब्बल ४३ लाख ६४ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (43 lakhs cheated one with lure of good returns Nashik Cyber Fraud crime)

प्रविण एकनाथ वंजारी (रा. दातेनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात व्हॉटसॲप क्रमांकावरून त्यांच्या व्हॉटसॲपवर संपर्क साधला आणि त्यांना टीके गोल्ड ॲण्ड ट्रेडिंग कंपनी या नावाच्या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲड केले होते.

सोन्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यामध्ये चांगला परताव्याची हमी देत वंजारी यांचा विश्वास संपादन केला.

संशयित सायबर भामट्याने गुंतवणूक करण्यासाठी वंजारी यांना विविध व्हॉटसॲप क्रमांकांवरून संपर्क साधून आयडीएफसी, यस बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल या बँक अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे वंजारी यांनी पैसे भरले. नोव्हेंबरपर्यंत त्यांना केलेल्या गुंतवणूकीवर परतावा आलाच नाही.

त्यामुळे त्यांनी जाब विचारला असता संशयितांनी या ना त्या कारणाने त्यांची टाळाटाळ केली असता, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी नाशिक सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT