ashram shala.jpg 
नाशिक

अखेर राज्यातील आश्रमशाळांचा विजेचा प्रश्‍न मार्गी; पाच कोटींचा निधी मंजूर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यातील दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांना भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्‍नापासून मुक्त करण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात सोलर आश्रमशाळांची निर्मिती केली जाणार आहे. राज्यातील सर्व २९ प्रकल्प कार्यालयांतील प्रत्येकी दोन आश्रमशाळांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली जाईल. या योजनेकरिता केंद्र शासनाकडून पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सोलर आश्रमशाळांच्या निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प

राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. यातील सुमारे तीनशेहून अधिक आश्रमशाळा विविध दुर्गम भागात आहेत. बदलत्या काळानुसार राज्यातील सर्व आश्रमशाळा डिजिटल झाल्या असल्या, तरी ग्रामीण भागात अनेक मूलभूत समस्यांसह वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक वेळा शिक्षकांना अध्ययन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जावे, वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्येपासून शाळांची सुटका व्हावी, वीजबिलांमध्ये बचत व्हावी, शाळांसाठी ऊर्जेचा शाश्‍वत स्त्रोत तयार व्हावा, या उद्देशाने राज्यात आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महावितरण यांच्यातर्फे प्रायेगिक तत्त्वावर निवडक आश्रमशाळांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे.

यासाठी केंद्राकडून नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावती अपर आयुक्त कार्यालयास प्रत्येकी एक कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेनुसार चारही अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रकल्प कार्यालयातील दोन आश्रमशाळांची निवड केली जाणार आहे. नव्या योजनेमुळे आश्रमशाळेच्या विजेच्या बिलांत बचत होऊन अपारंपरिक ऊर्जेचा वापर आणि पर्यावरण संवर्धन होणार आहे. 

सात सदस्यांची समिती 

ही योजना राज्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, महाउर्जा, महावितरण विभागाचे अधिकारी यांचा समावेश असेल. योजनेसाठी शाळा नियुक्तीपासून ते सर्व योजना यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी या समितीची असेल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT