funds esakal
नाशिक

Nashik News: नाशिक रोडच्या प्रस्तावित कोठारी नाट्यगृहाला शासनाकडून 5 कोटी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जेल रोड येथे ७२० आसन व्यवस्थेचे नविन नाट्यगृह नाशिक महापालिकेने मंजूर केले असून, त्यासाठी राज्य शासनाने ५ कोटीच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. (5 Crores from Govt to Proposed Kothari Theater of Nashik Road News)

जेल रोड येथील प्रस्तावित नाट्यगृहासाठी ५० टक्के रक्कम नाशिक महापालिका व उर्वरित ५० टक्के रक्कम महाराष्ट्र शासनाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिली जाणार आहे.

या नाट्यगृहासाठी ठरल्यानुसार महाराष्ट्र शासनाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, तो महापालिकेला वर्ग करण्यात आला.

नवीन नाट्यगृह मंजूर झाले, त्या वेळेस या कामाचे अंदाजपत्रकी रक्कम १८ कोटी होती. नवीन डीएसआर किमतीप्रमाणे या कामाची अंदाजपत्रकी रक्कम आता सुमारे ३५ कोटी रुपये झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर काम सुरु होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उर्वरित निधी महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निधीसाठी पत्र दिले.

श्री. भुसे म्हणाले, की नाट्यगृहामुळे नाशिक रोड भागातील नाट्यप्रेमीची गरज पूर्ण होणार असून, अधिवेशनात कोठारी नाट्यगृहाचा विषय मार्गी लागणार आहे.

शासनाकडून निधी प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी आग्रही भूमिका घेत पुरवणी अधिवेशनात या नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT