Wolf attack  esakal
नाशिक

Nashik News : लांडग्यांच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार; 9 गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : धुळगाव येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ९ शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. इतर शेतकरीही धास्तावले आहेत. (5 goats killed in wolf attack 9 seriously injured Nashik News)

तालुक्यात पश्चिम भागात तसेच इतरत्रही अधूनमधून बिबट्या आल्याची चर्चा होते. त्यातच पूर्व भागातील राजापूर, ममदापूर भागातही शेळ्या खाल्याच्या घटना आहेत. मात्र शहराजवळ असलेल्या व डोंगराळी पट्ट्यापासून लांबवर असलेल्या धुळगाव येथे लांडगा आल्याची घटना घडल्याने शेतकरी व पशुपालक धास्तावले आहेत.

धुळगाव येथील शेतकरी दिगंबर जगताप हे शेळ्या नेहमीप्रमाणे बाहेर बांधून घरात झोपले होते. रात्री दोनच्या सुमारास शेळ्यांसाठी बांधलेल्या कुंपणा खालची माती उकरून लांडग्याने शेळ्यावर हल्ला केला. या हल्लात नऊ शेळ्या जखमी झाल्या असून पाच मृत्युमुखी पडल्या आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

घटनेची माहिती मिळताच वनविभागासह पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच विच्छेदन केले. घटनेची माहिती मिळताच माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, योगेश सोमवंशी, भगवान गायकवाड, तुषार गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, बाजीराव डोईफोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने मृत शेळ्यांचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी माजी सभापती प्रवीण गायकवाड यांच्यासह धुळगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT