Officers and officers of the credit institution present at the annual general meeting of the Nashik District Gram Sevak Credit Union on Sunday to honor meritorious children and retired members. esakal
नाशिक

Nashik News: जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेतर्फे यंदा 5. 44 टक्के लाभांशाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या रविवारी (ता. १०) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ५.४४ टक्के लाभांशाची घोषणा अध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी केली. ग्रामसेवक भवन, बाजीरावनगर तिडके कॉलनीतील सभागृहात ही सभा झाली.

गुणवंत पाल्य व निवृत्त सभासदांच्या सन्मानासह विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गुणवंत पाल्य व निवृत्त सभासदांचा सत्कार झाला. (5 percent dividend announced by Zilla Gramsevak Credit Institution this year Nashik News)

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, रवींद्र परदेशी, दीपक पाटील, डॉ. भालचंद्र चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूसाहेब अहिरे, राज्य उपाध्यक्ष ज्योती केदारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, चिटणीस राजेंद्र जाधव, मानद सचिव नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते.

अध्यक्ष ठाकरे म्हणाले, की संस्थेची कर्जमर्यादा १३ लाख असून, आकस्मित कर्जमर्यादा ३० हजार एवढी आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल ३५ कोटी ७२ लाख असून, संस्थेला आर्थिक वर्षात एक कोटी ८५ लाखांचा नफा झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व एक ते तेरा विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य मानद अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांनी जिल्हा पदोन्नतीचे प्रश्न लवकर सोडवावेत, अशी मागणी केली. वर्षा फडोळ यांनी सर्व ग्रामसेवकांना नवीन बदलाला सामोरे जावे लागेल, ग्रामपंचायत पातळीवरील सर्व काम आता ऑनलाइन करण्यात येतात.

ग्रामविकासाच्या विविध योजना गावपातळीवर राबवून नाशिक जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. संजय गिरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT