crime Media Gallery
नाशिक

मालेगावात तीन देशी पिस्तुलांसह पाच संशयितांना अटक

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील नयापुरा व नूरबाग परिसरात मध्यरात्री जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस पथकाने तीन देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त केले. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने जिल्ह्यात विविध कारवाया सुरू आहेत. या मोहिमेत पोलिसांनी शहरात मोठी कारवाई केली.

अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे, हवालदार दिनेश पवार, पोलिस नाईक राकेश उबाळे, पोलिस शिपाई तुषार आहिरे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. पोलिसांनी कारवाईत पिस्तूल व काडतुसासह ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत अवैधरीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या हफिजूर रेहमान मोहम्मद इद्रीस (रा. नयापुरा), इम्रानखान अताउल्लाखान उर्फ शेट्टी (रा. दातारनगर), शेहजाद अख्तर मोहम्मद सिद्दीक (रा. हजारखोली), अब्दुल रेहमान शेख हसन (रा. कमालपुरा), अझरुद्दीन गयासुद्दीन सैय्यद (रा. आयशानगर) यांना अटक करण्यात आली. आझादनगर व आयशानगर पोलिस ठाण्यात विनापरवाना प्राणघातक शस्त्र बाळगण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT