crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बुलेटसह 5 दुचाक्या लंपास; दुचाकी चोरट्यांचे पोलीसांना आव्हान

महागड्या बुलेटसह शहर परिसरातून पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महागड्या बुलेटसह शहर परिसरातून पाच दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. (5 two wheeler stolen with bullets in city nashik crime news)

प्रताप किसन चव्हाण (रा. अमृतधाम, आडगाव) यांची ३० हजारांची शाईन दुचाकी (एमएच १५ एचडी १२८१) आडगाव नाका येथील सनी बार येथे पार्क केली असता, गेल्या २५ तारखेला अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश वसंत पवार (रा. दत्तनगर, अंबड) यांची ७० हजारांची पल्सर दुचाकी (एमएच १५ एचएफ ४५२५) गेल्या शुक्रवारी (ता. २६) सिटी सेंटर मॉलच्या स्टॉप पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर मोहन मोरे (रा. रायगड चौक, सिडको) यांची २५ हजारांची शाईन दुचाकी (एमएच १५ डीडब्ल्यु ३७५९) राहत्या घराच्या पार्किंगमधून गेल्या शनिवारी (ता. २७) मध्यरात्री चोरीला गेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ खंडेराव लहाने (रा. सोनगिरी, ता. सिन्नर) यांची १५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ डीएक्स ६०१५) गेल्या शनिवारी (ता.२७) दुपारी शिंदेगावातील दातांच्या दवाखानासमोरून चोरीला गेली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईन करीम शेख (रा. स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) यांची ९० हजारांची बुलेट (एमएच १५ एचएल ७३६४) गेल्या शनिवारी (ता.२७) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी देवळाल कॅप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT