Citylinc news
Citylinc news esakal
नाशिक

Citylinc Electric Bus : शहरात लवकरच धावणार 50 इलेक्ट्रिक बस!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून आता रस्त्यावर लवकरच ५० इलेक्ट्रिक बस धावणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. ६) निविदा प्रसिद्ध करण्यात आली. केंद्र सरकारच्या नॅशनल एअर क्लिनिंग प्रोग्रॅम (एन- कॅप) योजनेमधून अनुदान प्राप्त होणार आहे.

महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून २०० सीएनजी व ५० डिझेल बस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्त्वावर चालविल्या जात आहे. (50 Citylinc Electric Buses will run in city soon nashik news)

त्याचबरोबर सिटीलिंक कंपनीने ५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वी केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. प्रतिबस ५५ लाख रुपये अनुदान मिळणार होते.

परंतु केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली नाही. त्यानंतर आता महापालिकेने ‘एन-कॅप’ अर्थात नॅशनल एअर क्लीन मिशन योजनेअंतर्गत ५० बससाठी केंद्र सरकारकडे नवीन प्रस्ताव सादर केला. त्याला तत्काळ मंजुरी मिळाली. ‘एन-कॅप’ अंतर्गत महापालिकेला २२ कोटी रुपयांचा निधी हवा शुद्ध करण्यासाठी मिळत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्या निधीतून इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति ५० लाख रुपये अनुदान या योजनेतून व ते केले जाणार आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्त्वावर बारा वर्षांसाठी ठेकेदारामार्फतच बस चालवल्या जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिक बस चालविल्या जातील.

इलेक्ट्रिक बससाठी आडगाव येथील ट्रक टर्मिनल येथे चार्जिंग स्टेशनदेखील उभारले जाणार आहे. ठेकेदारांना निविदा सादर करण्यासाठी ६ मेपर्यंत कालावधी आहे. पहिल्या टप्प्यात ठेकेदार आले नाही, तर महिन्याभराची मुदत वाढ दिली जाणार आहे. तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, त्यानंतर ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT