Funding esakal
नाशिक

Nashik News: नाशिकला रेल्वे कोच दुरुस्ती डेपोसाठी केंद्रातर्फे 50 कोटी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला रेल्वे कोच डेपो निर्मितीसाठी रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटींच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासह इतरही वेळेत रेल्वेच्या कोचची निगा राहावी, कोचची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी तसेच रेल्वे कोचचा मेंटेनन्स वेळेत आणि जलद गतीने व्हावा, यासाठी नाशिकला कोच दुरुस्ती, मेंटेनन्स डेपो उभारण्यात येणार आहे. (50 crores from Center for railway coach repair depot to Nashik)

रेल्वे कोच डेपोमुळे नाशिकच्या उद्योगात भर पडणार असून, रोजगारनिर्मितीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. रेल्वे कोचच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी डेपोची निर्मिती व्हावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते.

खासदार गोडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भुसावळ, मुंबई आणि दिल्लीस्थित रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत कोच डेपोची उपयुक्तता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

नाशिकला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे कोच दुरुस्ती डेपो होणे गरजेचे आहे.

कोच डेपोच्या निर्मितीची मागणी न्यायिक असल्याने विभागाने याकामी प्रस्ताव तयार करून नाशिकला कोच दुरुस्ती व मेंटेनन्स डेपोच्या निर्मितीसाठी रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटींच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली.

कोच डेपोमुळ राज्यातील विविध रेल्वे मालगाड्या आणि प्रवासी रेल्वेगाड्यांच्या कोचच्या मेंटेनन्ची कामे जलद गतीने होणार आहेत.

"रेल्वे कोच दुरुस्ती व मेंटेनन्स डेपो निर्मितीच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली असून, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे."- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT