Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : बांधकाममध्ये ठराविकांना प्रतिनियुक्तीवर घेण्याचा घाट; विभागातून 50 लाखांची फाईल गायब

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकमधून अंतर्गत बदली प्रक्रियेत तालुकास्तरावर बदली झालेल्या काही ठराविक कर्मचाऱ्यांना पुन्हा विभागात प्रतिनियुक्तीवर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच तालुकास्तरावर बदली झालेल्या कर्मचारी बांधकाम विभागात येऊन फायली फिरवत असल्याची चर्चा आहे.

यातील एका कर्मचाऱ्याकडे तर बांधकाम विभागातील कपाटाच्या चाव्याही असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याच प्रकारात बुधवारी (ता. १८) विभागातून पर्यटनची स्वाक्षरी झालेली ५० लाखांची फाईल गहाळ झाली असल्याची चर्चा आहे. (50 lakh file missing from construction department of zp nashik news)

वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी अंतर्गत बदली प्रक्रिया राबवत कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यात आले. यात प्रामुख्याने बांधकाम एकमधील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या या तालुकास्तरावर झाल्या. बदली होऊनही संबंधित कर्मचारी टेबल सोडत नसल्याचे दिसून आले.

त्यावर ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर विभागातील प्रशासनाने तत्काळ बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. कार्यमुक्त झालेले कर्मचारी तालुकास्तरावर हजर झाले. मात्र, अद्यापही काही कर्मचारी बांधकाम विभागात येऊन कामकाज करीत असल्याची विभागातीलच कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

महत्त्वाचे टेबल असल्याने या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचा हट्ट काही अधिकारी वर्गाकडूनही केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कर्मचारी सर्रासपणे विभागात काम करीत असल्याचे बोलले जात आहे. विभागात येऊन काम करीत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांकडून विरोध सुरू झाल्याने आता संबंधित त्या कर्मचाऱ्यांनी प्रतिनियुक्तीवर पुन्हा बांधकाम येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यासाठी आमदारांचे पत्र घेऊन दबाब टाकला जात असल्याचे सांगितले जात आहे. बांधकाम विभागात हे प्रकार सुरू असतानाच बुधवारी पर्यटन विभागाची मंजूर ५० लाख रुपयांच्या कामांची फाईल गहाळ झाली. फायलींवर वरिष्ठांची स्वाक्षरी झाल्यावर संबंधित फाईल गायब झाली असल्याने खळबळ उडाली आहे.

"फायलींचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असताना फाईल गायब होणे हा प्रकार गंभीर आहे. याबाबत चौकशी केली जाईल. तसेच, विभागाला भेट देऊन कर्मचाऱ्यांची माहिती घेणार आहे." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT