Agriculture
Agriculture esakal
नाशिक

Nashik Agriculture: 50 टक्के पेरणी, शेतकऱ्याचे आभाळाकडे डोळे

संदीप मोगल

Nashik Agriculture : दिंडोरी तालुक्यात दर वर्षीच्या सरासरी एव्हडा पाऊस झाला असला तरी मागील वर्षीपेक्षा ५३५ मिलिमीटर पाऊस कमी पडल्याने सर्वच धरणे रिकामी आहेत.

जवळपास निम्मा पावसाळा संपत आला असला तरी अजूनही धरण, विहीर व कूपनलिकेत पाणीसाठा वाढला नाही. असे असले तरी तालुक्यात भात व नागली वगळता जवळपास ५० टक्के पेरणी करून शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. (50 percent sowing farmer eyes on sky Nashik Agriculture news)

तालुक्यात टोमॅटो लागवडीला सुरवात झाली असून, या महिन्याच्या अखेरीस जवळपास सर्वच लागवड पूर्ण होईल. सोयाबीनची जवळपास पाच हजार हेक्टर, तर भुईमुगाची दोन हजार १५० हेक्टर लागवड पूर्णत्वाकडे आहे.

भाताची लागवड सुरू असून, नागलीची रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. उडीद, तूर, मूग याची लागवड सुरू आहे. २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ असल्याकारणाने नागली, वरई, ज्वारी, बाजरी, कोद्रा, सावा, राळा या पिकांचे क्षेत्रवाढीकडे कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वर्षी सोयाबीन पीकपेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार, असा अंदाज वर्तविला जात आहे. तर मक्याच्या क्षेत्रात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात बाजरी क्षेत्रात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.

सर्वाधिक धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या दिंडोरी तालुक्यात आजही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

आज धरणामध्ये मागील वर्षाचेच शिल्लक पाणीच उरले असून, साठ्यात वाढ झालेली दिसत नाही. दिंडोरी तालुक्यातील पावसाची जुलैअखेर सरासरी २५५ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात २८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT