women reservation esakal
नाशिक

महिलांची लॉटरी लागणार...

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेच्या (nmc) सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३१) सकाळी साडेदहाला महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंबंधीची सर्व तयारी सुरू आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात आरक्षणाची सोडत होणार आहे.

अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) अशा तीन संवर्गासाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढले जाणार आहे. महापालिकेतील एकूण जागेच्या ५० टक्के महिला राखीव जागांसाठी येत्या ३१ मेस अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला जागा निश्‍चिती करिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य आयोगाला ३१ मेस होणाऱ्या आरक्षण सोडतीत १३३ जागांमधून ६७ जागांवर महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार असल्याने आता साऱ्यांच्या नजरा महिला आरक्षणाकडे लागल्या आहेत.

प्रस्थापितांचे पत्ते कट होण्याची भीती
महिला आरक्षण निघाल्यास त्या प्रभागात प्रस्थापितांचे पत्ते कट होण्याची भीती आहे, तसे अनेक प्रभागात आरक्षण सोडतीमुळे महिलांची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे चिठ्ठीच अनेकांचे राजकीय भविष्य ठरविणार आहे. चिठ्ठी पद्धतीने हे आरक्षण काढण्यात येणार असल्याने त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. शिक्षण विभागावर त्याची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, वाद होण्याची शक्यता गृहीत धरून सोडत प्रसंगी पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. महापालिकेची मुदत मार्च महिन्यात संपली असली तरी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ती पुढे ढकलली गेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे महापालिकेत (Nmc) ६७ जागांवर महिलासाठी आरक्षण पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

Career Horoscope: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT